Monday, 6 August 2012

बदलता समाज

A A << Back to Headlines     
स्थलांतर करणं, दैनंदिन जगण्यात पोटासाठी घर सोडून दुसरीकडे जाणं, हा प्रत्येक जीवमात्राचा नैसर्गिक गुणधर्म आहे. खरं म्हणजे ती गरजही आहे. एकाच ठिकाणी कोणाची प्रगती होत नाही. नदीचं वाहतं पाणीसुद्धा एकाच ठिकाणी तुंबून राहिलं तर ते मचाळतं, शेवाळतं, दूषित होतं. माणसाचा बौद्धिक, शैक्षणिक, आर्थिक विकास व्हायचा असेल तर त्यालासुद्धा सारखं नव्या दिशेच्या शोधात राहावं लागतं तेव्हाच नव्या वाटा गवसू शकतात.

ज्यांनी आपला मूळचा प्रदेश सोडून दुसरीकडे स्थलांतर केलं त्यांचाच विकास नव्या भूमीवर झपाटय़ाने झाला. हे इतिहासातील अनेक उदाहरणांवरून कळून येते. यवनांच्या स्वार्‍या, इंग्रजांचं आगमन यामुळे भारतात झालेलं परिवर्तन आपल्याला माहीत आहेच. परकीय भूमीत जायचं तर तिथे स्थिर होण्यासाठी दोन पद्धतींचा वापर करावा लागतो. एक तर नम्रपणे स्थानिक लोकांची सेवा करून त्यांची मने जिंकून घेऊन तिथं बस्तान बसवायचं किंवा पराकोटीचं क्रूर होऊन आक्रमण करून तिथल्या लोकांत दहशत पसरवायची. मूळच्या लोकांना हाकलून लावायचं. याच पद्धतीने भारतात आलेल्या आक्रमकांनी आपली पाळेमुळे या भूमीत रोवलेली दिसून येतात.

प्रत्येक काळात भ्रमंतीचे आणि नव्या भूमीत स्थलांतरित होण्याचे संदर्भ वेगवेगळे असतात. जसे अर्थसत्तेसाठी आक्रमक लोक नव्या भूमीचा शोध घेतात त्याचप्रमाणे नव्या भूमीत आपल्या धर्मसत्तेचा प्रभाव पाडण्यासाठी धर्मप्रसारक जात असतात. अर्थात, हा दुसरा मार्ग अहिंसेचा आणि मनमिळवणीचा असतो. बौद्ध धर्म, जैन धर्म जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचला तो वाक्चातुर्य असणार्‍या धर्मप्रसारकामुळे. महानुभाव पंथाची मुहूर्तमेढ रोवून त्या धर्माचा प्रसार करण्यासाठी चक्रधर स्वामींनी आयुष्यभर भ्रमंती केली. ज्या गावखेडय़ात ते गेले तिथे त्यांनी आपल्या आचारविचाराने लोकांना प्रभावित केले. स्वरूपदर्शन विद्या आणि वयस्तंभिणी विद्या ह्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अद्भुत गुणदर्शनामुळे त्यांना दैवत्व प्राप्त झाले.

परक्या भूमीत जाण्यासाठी माणसाने पाळीव प्राण्यांचा फार चातुर्याने उपयोग करून घेतला. प्राचीन काळात व मध्ययुगीन काळात घोडा, उंट, बैल, हत्ती, गाढव, खेचर अशा जनावरांच्या माध्यमातून माणसाने केवळ प्रवासच केला असे नाही तर युद्धभूमीतही यश संपादन केले. याचाच अर्थ असा की, माणसाच्या भ्रमंतीच्या काळात त्याच्या प्रगतीला त्याचे बुद्धिचातुर्य कारणीभूत ठरले आहे. 'बळी तो कानपिळी' अशा बलशक्तीच्या काळात त्याच्या मनगटातील बळ त्याला यश मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरले. पण जागतिक पातळीवर पसरलेल्या औद्योगिक क्रांतीच्या काळात सत्तासंपादनासाठी बळशक्तीचा वापर हे सिद्ध निकष बदलले.'बळा'ऐवजी त्याची बुद्धी प्रभावी ठरू लागली.

बुद्धीच्या बळावर दळणवळणाच्या क्षेत्रात त्याने अपूर्व असे स्तिमित करणारे वाहनांचे शोध लावले. जमिनीवरूनच नव्हे, तर पाण्यातून आणि आभाळातून म्हणजे जलमार्गे आणि हवाईमार्गे तो नव्या भूमीकडे झेपावू लागला. नवनवीन यंत्रांच्या माध्यमातून भौतिक जीवनात आमूलाग्र बदल घडून येईल अशा गोष्टी सिद्ध झाल्या. औद्योगिकीकरणात शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. वेगवेगळय़ा क्षेत्रातील ज्ञान संपादन करून उपजीविका तर करता येतेच, पण आपले जीवनसुद्धा समृद्ध आणि सुखी बनवता येते. ही बाब लक्षात आल्यानंतर शिक्षणासाठी आणि त्यानंतर नोकरीसाठी आपली भूमी सोडून जाणार्‍यांची संख्या वाढली. नवा धर्म, नवा समाज, नव्या भूमीत स्थलांतरित झाला तरी तो आपला धर्म, आपली जात, आपले रीतिरिवाज यांच्याशी घट्टपणे बांधलेला होता. त्यामुळे विवाह जुळविण्यासाठी नवे गणगोत्र निर्माण करण्यासाठी त्याला पुन्हा आपल्या प्रदेशाकडेच वळावे लागत होते. रोटी व्यवहाराप्रमाणेच समाजव्यवस्थेचा अविभाज्य घटक असणारा बेटी व्यवहार करण्यासाठी माणसाला चारीमेरा फिरून आपली कुटुंबसंस्था अबाधित राखावी लागत होती.

जसजशी दळणवळणाची गरज वाढू लागली तसतसे नवीन साधने आलीत. मोटार, कार, सायकल, बाईक ह्या वाहनांची रस्त्यावर महामूर गर्दी वाढली. डिझेल, पेट्रोल हे जीवनाचे अविभाज्य घटक बनले. वाहतुकीचा सगळय़ात मोठा परिणाम असा झाला की, गावे शहरांना जोडली गेली. खेडी गावांना जोडली गेली. त्यातून पक्के रस्ते तयार होत गेले. सर्जनशील भुईच्या पोटात पाणी, गिट्टी, सिमेंट, डांबर या माध्यमातून कायमचे पक्के वळ उमटवले गेले. त्यावरून ग्रामीण माणूस शहराकडे आकर्षित होण्याचे प्रमाण वाढले. इथला झगमगाट, इथली भौतिक साधने, इथला चंगळवाद माणसाला भुरळ घालू लागला.

स्वातंर्त्योत्तर काळात दूरवर पसरलेला, केवळ शेतीवर अवलंबून असणारा माणूस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून, राजकीय निवडणुकीच्या माध्यमातून शहरांशी जोडला गेला. जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या बाबी त्याच्या जगण्याच्या भाग बनल्या. कोर्टकचेर्‍या, सिनेमागृह, हॉटेल्स, शाळा, कॉलेज, दवाखाने इत्यादी बाबींमुळे मानवीजीवन अधिक गतिमान झालं. मूळची जागा सोडून दैनंदिन कामासाठी इतरत्र जाणं, हा त्याच्या जीवनाचा अपरिहार्य भाग बनला.

जसा हा बदल इतर क्षेत्रात घडून आला तसाच तो शेतीच्या व्यवसायाच्या संदर्भातसुद्धा घडून आला. पूर्वीची शेती ही स्वावलंबी आणि ग्रामकेंद्रित होती. देशी बियाणे गावातच शेतकर्‍यांच्या घरात उपलब्ध असायचे. हंगामाच्या वेळी निवडक शेतकरी कणसे, शेंगा, ओंब्या, घाटे वेगळे काढून त्यातलं दळदार बियाणं, कडूनिंबाचा पाला आणि राख टाकून कणग्यांना पेंड घालून टिकवून ठेवलं जायचं. रोहिणी नक्षत्रात आभाळ आंडे गाळायला लागलं की, शेतकर्‍याच्या घरातल्या स्त्रिया त्या बियाण्यांची साफसफाई, पाखडपुखड करताना घराघरांच्या अंगणात दिसून यायच्या. शेतकरी औताफाटय़ांची दुरुस्ती करण्यासाठी सुतारा-लोहाराच्या कामठय़ावर जाता-येताना दिसून यायचा. हाराकीचं युग येण्यापूर्वीची शेती म्हणजे हायब्रिड, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा शेता-रानात अजिबातच वापर केला जात नव्हता. त्या काळातील शेतकरी पेरणीच्या काळात गाव सोडून अजिबात कुठे जात नव्हता. बेभरवशाच्या शेतीच्या धंद्याला ईश्वरी आशीर्वाद मिळावा म्हणून संयुक्त कुटुंबातील बाप, भाऊ, पोरगा असे आलटूनपालटून दिंडय़ामधून पंढरीला जात तेवढाच एक अपवाद. मात्र त्यामागची भावना ही निखळ आध्यात्मिक असायची. हौसेमौजेचा त्यात भाग नसायचा. कष्टकर्‍यांचा देव विठ्ठल, त्याचे आशीर्वाद घेऊन आलो नाही तर कुणबिकीला बरकत येणार नाही. अशी पिढय़ान्पिढय़ांपासून घरात पोसली गेलेली मानसिकता त्याला कारणीभूत असायची.

आजच्या पेरणीच्या दिवसाकडे पाहिले तर मात्र ग्रामीण समाजजीवनातून त्या सगळय़ा बाबी हद्दपार झाल्याचे दिसून येते. आज बांधावरच्या झाडातला पाऊस भिजला, मोहरून आलेल्या पावशा पक्षी 'पेर्ते व्हा' म्हणत असतो आणि गावशिवारातला शेतकरी, बॅंकेमधून कर्जासाठी, बियाण्यांसाठी, खतांसाठी कृषिकेंद्राभोवती चकरा मारत असतो. घर सोडून अंगण पारखं करीत असतो. मानवीजीवनातील भ्रमंतीचे, स्थलांतरांचे संदर्भ असे नित्य बदलत असतात. भूमी तीच असते. माणसाचे वर्तन, त्याच्या वर्तनाचे कार्यकारणभाव नेहमीच बदलत असतात. असेच बदलत्या समाजरचनेनुसार बदलत राहणार असतात.

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास', 'तहान'

या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

जानेफळ, ता. मेहकर, जि. बुलडाणा

Friday, 3 August 2012

मनाचं सामर्थ्य जेवढं विधायक तेवढंच धोकादायक


मनाचा खेळ अद्भूत आहे. मानवी जीवनाच्या इतिहासात दीर्घकाळ तो अनाकलनीय होता. मानव प्राण्याची मूळ भाषा पांच इंद्रियांची. पाहणं, ऐकणं, स्पर्श, वास, चव या पांच इंद्रियांच्या अनुभव माध्यमानं आपण सारं जग समजून घेतो, ज्ञान प्राप्त करतो. आपण जे पाहतो त्याची प्रतिमा आपल्या मेंदूत उमटते. आपली इच्छा असेल तेव्हा ही मेंदूत उमटलेली प्रतिमा पुन्हा पाहता येते. याचाच आधार घेऊन मानव जातीला भाषा निर्माण करता आली आहे. समजा घोडा प्रत्यक्ष पाहिला. घोडय़ाची प्रतिमा मेंदूत प्रतिबिंबित झाली. त्याला माणसानं घोडा या उच्चारासोबत जोडलं. जेव्हा जेव्हा तो घोडा प्रत्यक्ष पाहतो तेव्हा तेव्हा त्याला 'घोडा' हा उच्चार आठवतो. जेव्हा कुणीतरी 'घोडा' असा उच्चार करतो तेव्हा त्याला मेंदूत उमटलेला घोडा प्रत्यक्ष (समोर नसतानाही) दिसतो. प्रत्यक्ष ती गोष्ट, घोडा समोर नसतानाही ती घोडय़ाची प्रतिमा आपण पुन्हा पाहू शकतो. याला आपण आजच्या काळात तर्ळीरश्रळीश करणं, चित्ररुप कल्पनेत पाहणं असं म्हणतो. माणसानं आपल्या याच सामर्थ्याचा उपयोग करून भाषा निर्माण केली आहे.

हे चित्ररूप कल्पनेत पाहणं, तर्ळीरश्रळीश करण्याचं सामर्थ्य प्रत्येक माणसात असतं. बालपणात ते विलक्षण असतं. पण आजच्या सुसंस्कृत व समृद्ध जगात वाढत्या वयासोबत हे तर्ळीरश्रळीश करण्याचं सामर्थ्य कमी कमी होत जातंड.ोळ्यापुढे चित्रमालिका उभी करण्याचा प्रयत्न केला तर काही लोकांना चित्रमालिका कल्पनेत दिसत नाही. काही लोकांना कल्पना केल्यावर चित्रमालिका प्रत्यक्ष दिसते आणि काही लोकांना तर ही चित्रमालिका अतिशय जिवंत दिसते. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यासारखी वाटते. इतकी की कल्पना व प्रत्यक्ष यातील फरकही करता येत नाही. माणसाच्या मनाच्या या सामर्थ्यानं दीर्घकाळापासून माणसाला भूरळ घातली आहे आणि कोडंही घातलं आहे. रोज रात्री आपण 7-8 तासांच्या झोपेत 30 मिनिटांपासून ते 150 मिनिटांपर्यंत स्वपA पाहात असतो. प्रत्येक जण रोज स्वपA पाहातच असतो. स्वपA पाहतांना ती आपण जगत असतो. त्या क्षणी ती आपल्याला 100 टक्के खरीच वाटत असतात. खडबडून जागं झाल्यावर आपल्या लक्षात येतं, अरे 'हे खरं नव्हतं हे तर स्वपA होतं.' पण मनुष्यजात मात्र दीर्घकाळ स्वपAांना खरं मानत असे. त्यांना वाटत असे आपला आत्मा प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेला होता, भटकून त्या पद्धतीचा अनुभव घेऊन तो शरीरात पुन्हा परत आला.माणसानं वेगवेगळ्या प्रार्थनेच्या, मनाच्या एकाग्रतेच्या प्रक्रिया शोधल्या. त्यांचा संस्कृती, धर्म, आराधना इत्यादींच्या नावाने वापर केला. त्यात नवेनवे प्रयोग केले. त्यातून वेगवेगळ्या मेडिटेशनच्या प्रक्रिया विकसित केल्या आणि त्याला अद्भूत खजिन्याचा शोध लागला.मनाच्या विशिष्ट अवस्थेत त्याला अधिक चांगली दृष्य मालिका दिसते. एरवी जागृत अवस्थेत जे दिसत नाही, कल्पना केल्यावरही दिसत नाही. ते मात्र मेडिटेशनद्वारा विशिष्ट अवस्थेत गेल्यावर दिसतं. जिवंत दृष्य अनुभव घेतल्यासारखं दिसतं म्हणून याला आधिभौतिक, पारलौकिक अनुभव मानणं स्वाभाविकच होतं. स्वपAांमध्ये सलगता नसते, प्रतिमा सारख्या बदलत असतात. अनेकदा स्वपAांमध्ये प्रतिमा बदलत जाते पण विचार मात्र तोच असतो, प्रतिमांशी न जुळणारा असतो. हा स्वपAांचा अनुभव घेणार्‍या माणसाला हे मेडिटेशनमधलं तर्ळीरश्रळीरींळेप खूप प्रभावित करून बोलं. हे वरच्या दर्जाचं अनुभूतीचं क्षेत्र आहे असं त्याला वाटू लागलं. हे तर्ळीरश्रळीरींळेप त्याला खरी अनुभूती वाटू लागली. हजारो वर्षापासून, धर्मांच्या उदयाच्या आधीपासून मानव जातीला या आधिभौतिक, पारलौकिक अनुभूतींनी झपाटून टाकलं.आपण आता एकविसाव्या शतकात जगतो आहोत. विसाव्या शतकात या क्षेत्रात खूप अभ्यास झाला. सगळेच विषय वैज्ञानिक शिस्तीनं तपासायचे, त्यात काटेकोर संशोधनं करून निखळ सत्य स्वीकारायचं या सवयीमुळं याही क्षेत्रात संशोधन झालीत. त्यात गवसलेलं सत्य मी तुमच्यासमोर मांडतो आहे. मन एकाग्र करणारी प्रक्रिया वापरली आणि एकाग्र अवस्थेत माणसाचं शरीर आणि मन पुरेसं रिलॅक्स झालं की माणूस अल्फा रिदम्च्या अवस्थेत जातो. म्हणजे त्याच्या मेंदूचे ए.ए.ऋ. तपासले तर या अवस्थेत ते 8 ते 12 सायकल्स परसेकंद असतात. प्रार्थना, मेडिटेशन, संमोहन, आराधना, भजन, कीर्तन या कोणत्याही माध्यमाद्वारे ही अवस्था माणूस गाठू शकतो. या अवस्थेत असल्यानंतर साधारणत: 50 ते 60 टक्के लोकांना उत्तम होतं. आणि यातील 25 ते 35 टक्के लोकांना उत्तम करश्रश्र्रीलळपरींळेप (भ्रम) होतं, होऊ शकतं. तर्ळीरश्रळीरींळेप होणार्‍यांना आपण दृष्य मालिका पाहतो आहे असं दिसतं. तर करश्रश्र्रीलळपरींळेपी होणार्‍यांना जी दृष्य मालिका दिसते त्यासोबत त्यांना ऐकू येतं, वास येतो, स्पर्श जाणवतो, चवही येते. पांचही इंद्रियांचे अनुभव येतात. विशेष म्हणजे आपण प्रत्यक्ष तो अनुभव जगतो आहे असं त्यांना वाटतं.मी उदाहरणाच्या माध्यमातूनच हा मुद्दा अधिक स्पष्ट करतो. 1983 सालची गोष्ट. 1982 सालच्या डिसेंबर महिन्यात मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावे चळवळ सुरू केली. त्यावेळी मी पत्रकार होतो. माझा एक पत्रकार मित्र अशोक एकबोटे याने गोव्यात 10 अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमांचा दौरा आखला. त्यावेळी तो गोव्यातील महाराष्ट्र शासनाच्या परिचय केंद्रात अधिकारी म्हणून काम करता होता. या आयोजनात त्याने काही डॉक्टर्स, प्राध्यापक यांना जोडून घेतलं होतं. पणजीतील बीड.ी.एस.मेडिकलचे खूप विद्यार्थी-विद्यार्थिनी या दौर्‍यात सहभागी झाले. गोवा अंधश्रद्धांबाबत खूपच संवेदनशील प्रदेश आहे. छोटसं राज्य. सारा प्रदेश ढवळून निघाला. प्रचंड ताण-तणावाखाली हा दौरा पार पडला. पुढे वर्षभर या दौर्‍याच्या क्रिया-प्रतिक्रिया गोव्यातील वृत्तपत्रातून उमटत राहिल्या.

या इ.ऊ.ड. च्या तरूण विद्यार्थ्यांशी छान गट्टी जमली. माझ्या भाषणात 'संमोहनात अशा अनुभूती घेता येतात,' असा उल्लेख प्रत्येक भाषणात व्हायचा. सगळी तरूण मुलं मागे लागलीत म्हणून त्यांच्यावर संमोहन-प्रयोग करायचे असं आम्ही ठरवलं. तोवर माझा संमोहनशास्त्राचा थिअरॉटिकल चांगला अभ्यास होता. पण मी फारसे कुणावर प्रॅक्टिकल्स केले नव्हते. पण माझ्या 'देखा जायेगा' स्वभावाप्रमाणं प्रयोग करायचा निर्णय घेऊन टाकला.40, 50 तरुण मुलं-मुली आणि 4 वयस्क मोठी माणसं या कार्यक्रमात सहभागी झालीत. त्यातील 20-25 मुलं-मुली व हे चार ज्येष्ठ नागरिक खोल संमोहनात गेले. बाकीच्यांना मी संमोहनातून बाहेर काढून प्रेक्षक बनवलं. (हे चारही ज्येष्ठ नागरिक आध्यात्माचा खूप अभ्यास करणारे होते. नियमित मेडिटेशनचा सराव करणारे होते. पण त्यांना आध्यात्मिक अनुभूती मात्र आल्या नव्हत्या. म्हणून आग्रहांन ते या प्रयोगात सामील झाले होते.)

बाकी तरुण मुलांवर मी प्रयोग सुरू केले. त्यावेळच्या स्वपAसुंदरी हेमा मालिनीच्या बंगल्यावर मुला-मुलींना पाठवलं. हिमालयात घेऊन गेलो, अंतराळात भटकवून आणलं. म्हणजे ते खोल संमोहनात असताना ''तुम्ही आता हेमामालिनीच्या बंगल्यात शिरता आहात. ती हंसतमुखानं तुमचं स्वागत करते आहे, हस्तांदोलन करते आहे.. वगैरे..'' शब्दांमध्ये मी वर्णन केलं.ज्येष्ठ लोकांना हेमामालिनीच्या बंगल्यावर पाठवणं योग्य नाही आणि त्यांना आध्यात्मिक अनुभूतीची ओढ आहे म्हणून त्यांना सांगितलं की आता तुम्ही ''बाळ कृष्णांच्या गोकूळात पोहोचला आहात. बाळकृष्ण रांगत रांगत तुमच्या मांडीवर येऊन बसले आहेत. त्यांचे हात दुधा-दह्यानं माखले आहेत. ते तुमच्या तोंडात दूध-दही घालताहेत.. बाळकृष्णांसोबत तुम्ही खेळता आहात.. बाळकृष्णांसोबत तुम्ही आहात..'' असं म्हणून मी त्यांना सोडून दिलं. इतर तरुणांवर वेगवेगळे प्रयोग करु लागलो. 3 तासांचा कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांना मी अनुभव विचारु लागलो. माझ्या डायरीत नोंदवू लागलो.मी शब्दांत बोललो ते संगळ्यांनाच प्रत्यक्ष दिसलं. पण प्रत्येकाचा अनुभव वेगळा होता. एका तरुणाला आंघोळ करून, टॉवेल गुंडाळून बाहेर आलेली ओले ती हेमामालिनी दिसली. त्याला लक्स साबणाचा वासही आला. दुसर्‍या एकाचं मध्येच आलेल्या धर्मेद्रशी भांडण झालं. मारामारी होता होता वाचली. हेमामालिनीनं या तरुणाची बाजू घेतली म्हणून तणतणत धर्मेंद्र बाहेर गेला.. वगैरे..

चार ज्येष्ठांना मी अनुभव विचारला. एकाचे बाळकृष्ण रांगतेच राहिले. दुसर्‍याचे भगवतगीतेपर्यंत पोहोचले. तिसर्‍यांचे रासक्रीडेत रमले.. वगैरे.शेवटी मी विचारलं, ''हे अनुभव खरे होते कां?'' यावर सगळी मुलं-मुली गंभीर होऊन म्हणाली'' सर आम्ही जे पाहिलं, अनुभवलं ते 100 टक्के खरं होतं असं वाटतं. पण पणजीतल्या एका हॉलमधून एवढय़ा कमी वेळात आम्ही मुंबईत-हेमामालिनीच्या बंगल्यावर, हिमालयात, अंतराळात कसं जाऊ शकणार? हा तार्किक विचार केल्यानंतर असं वाटतं की हे तुम्ही सांगता तसं करश्रश्र्रीलळपरींळेप भ्रम असावेत. पण आम्ही थोडसं संभ्रमात आहोत. अजूनही हिमालयातील बर्फाळ-थंडी जाणवते आहे.. वगैरे.''चार ज्येष्ठ नागरिक सांगत होते, ''सर खूपच चांगला अनुभव आला. आम्ही इतके वर्ष मेडिटेशन करतो आहे पण कधी बाळकृष्णांचं दर्शन झालं नव्हतं. खूप सुंदर अनुभूती आली.''

एका ज्येष्ठाने मात्र माझ्या भ्रम करश्रश्र्रीलळपरींळेपी या शब्दाबद्दल आक्षेप धेतला. ते म्हणाले, ''मानव याला भ्रम कसं म्हणायचं? अहो, बाळकृष्णांनी माझ्या तोंडात घातलेल्या दह्याची चव अजूनही माझ्या तोंडात रेंगाळते आहे. एवढं अविट गोडीचं दही माझ्या आयुष्यात यापूर्वी मी कधी खाल्लं नाही.. कुरुक्षेत्रावर अजरुनाला गीता सांगतांना भगवान कृष्णांना मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. गीता सांगतांनांचा कृष्णांचा आवाज मी ऐकला आहे. अजून ते शब्द, तो आवाज माझ्या कानात घुमतो आहे.. तरी याला भ्रम कसं मानायचं?''मला महत् प्रयासानं हे भ्रमच आहेत, असं समजावून सांगावं लागलं. त्यावेळी ठामपणे ते मी सांगितलंही. पण डिप ट्रान्समध्ये जो करश्रश्र्रीलळपरींळेपी चा अनुभव येतो ते एवढा खरा वाटतो, जिवंत वाटतो की त्याला खोटा ठरवणं भ्रम मानणं शक्य होत नाही हे त्यावेळी माझ्या लक्षात आलं. त्यानंतर मी ठरवून टाकलं. यापुढे संमोहनात कधीही देवाचं करश्रश्र्रीलळपरींळेपी सांगायचं नाही. हेमामालिनीच्या बंगल्यावर एवढय़ा दूर जाणं शक्य नाही. तिच्या बंगल्यावर सेक्युरिटी असते. असा सहज प्रवेश मिळू शकत नाही. हे पटू शकतं. पण देव कुठेही, केव्हाही भक्ताला भेटू शकतो या श्रद्धेमुळं अशा अनुभवांना भक्त भ्रम समजू शकत नाही हे माझ्या तीव्रतेनं लक्षात आलं.त्यानंतर मी पांच हजारपेक्षा जास्त तरुण-तरुणींना डीप ट्रान्समध्ये टाकून त्यांच्यावर प्रयोग केले. त्यांचे अनुभव रेकॉर्ड केले.त्यानंतर गेली 22 वर्षं मुंबईतून महाराष्ट्रभर व्यावसायिक पद्धतीनं ''स्वसंमोहन व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा'' चालवतो आहे. दीड लाख लोकं तरी कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. ''सूंदर बागेत भटकता आहात.. सूंदर पक्षी, फुलं, हरणं, ससे पिसारे फुलवलेले मोर आहेत.. टूमदार घरात शिरता आहात. हे एक तर्ळीरश्रळीरींळेप आणि समुद्रकिनारी पोहोचलात.. वाळूवर मोठय़ा बलूनला एक सुंदर झोपडी लटकली आहे. त्यात बसून अंतराळात जाता आहात.. समुद्रपक्षी.. पृथ्वीचा सुंदर गोल, चंद्र मंगळ, गुरु, शनि सगळ्यांजवळून जाता आहात..'' हे दोन्ही अनुभव प्रत्येक कार्यशाळेतल्या विद्यार्थ्यांना देतो. त्यातील निम्मे लोकांना एकतर तर्ळीरश्रळीरींळेप होतं वा प्रत्यक्ष करश्रश्र्रीलळपरींळेपी होतं.अनेकांना हा अनुभव अद्भूत वाटतो. हेलावून टाकणारा, चक्रातून सोडणारा वाटतो. पण हा अनुभव खरा नाही. हे केवळ भ्रम आहेत असं मी आधीपासून सांगत असल्यामुळं कुणाची फसगत होत नाही.25-35 टक्के लोकांना होऊ शकणारं इतकं खरं वाटतं की, तो भ्रम वाटतच नाही. पांचही इंद्रियांना अनुभव येतो, आपणच प्रत्यक्ष तिथे गेलो, पांचही इंद्रियांनी अनुभवून आलो असं वाटतं.

माणसाच्या मनाच्या या सामर्थ्याचे खूप विधायक फायदेही आहेत. आणि चलाख बदमाशांच्या हाती लागलं तर फसवणुकीसाठी वापरलं जाऊ शकणारं प्रभावी हत्त्यार सुद्धा आहे. कसं ? पुढे पाहू.

(लेखक श्याम मानव    अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832, 

गांधी,जेपी आणि अण्णा

म.गांधींचा काळ आम्ही पाहिला नाही. आमच्या जन्मा आधीच त्यांचे निधन झाले होते. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या प्रभातफेरीत लहानपणापासून महात्मा गांधी की जय म्हणत आलो. सामाजिक कामात पडल्यापासून गांधींचे अध्ययन सुरू केले. जसजसे वाचत गेलो, ऐकत गेलो, तसतसा हा माणूस भिडत गेला, मुरत गेला. अजूनही काही वाचले की नवे आकलन होत जाते. जयप्रकाश नारायण यांचा उत्तरकाळ मात्र पाहिला, अनुभवला. 1942 च्या चलेजाव आंदोलनातील हिरो म्हणून पहिल्यांदा जयप्रकाश नारायण यांचे नाव कानावर आले. त्यानंतर ते भूदान आंदोलनात समर्पित झाल्याचे कळले.

मला विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनाचे कधीच आकर्षण वाटले नाही. जे.पीं.नी त्यासाठी जीवदान दिले असे कळल्यावर त्यांच्याबद्दलचे आकर्षण काहीसे कमी झाले होते. चंबळच्या खोर्‍यातील दस्यूंचे समर्पण घडले तेव्हा या माणसाबद्दल पुन्हा आकर्षण वाटू लागले. पुस्तकात वाचावी अशी ती नाटय़पूर्ण घटना वाटली. जे.पीं.चा उत्तरकाळ मात्र पाहता आला. ऐंशीच्या दशकात आम्ही विद्यार्थी होतो. या काळात देशात विद्यार्थ्यांची तीन मोठी आंदोलने झाली. सर्वात आधी गुजरातच्या विद्यार्थ्यांनी मेसच्या जेवणाचे दर वाढविले म्हणून आंदोलन सुरू केले. ते वाढत जाऊन महागाई, बेकारी आणि भ्रष्टाचार या प्रश्नांपर्यंत पोहोचले. या आंदोलनामुळे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांना राजीनामा द्यावा लागला. तिकडे ते आंदोलन सुरू असतानाच मराठवाडय़ातील विद्यार्थ्यांनी उठाव केला. वसमतला नोकरीच्या मुलाखतीसाठी आलेल्या तरुणांवर गोळीबार झाला. त्यात दोघे दगावले. परभणीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कार टाकला. बघता बघता मराठवाडाभर हा वणवा पसरला. पहिले तेरा दिवस कोणतीही समिती नव्हती. तरुणांचा आक्रोश महागाई, बेकारी, भ्रष्टाचार या मुद्यांवरच होता. नंतर समिती झाली. विकास आंदोलनाच्या नेत्यांनी हे आंदोलन हायजॅक केले. मराठवाडा विकासाच्या काही मागण्या पदरात पडल्या व हे आंदोलनही विरले. त्याच्या आगेमागे बिहारमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले होते. त्यावर तेथील गफूर सरकारने गोळीबार केल्यानंतर विद्यार्थी जयप्रकाश नारायण यांच्याकडे गेले. जे.पी. त्यावेळी बिहारमधील मुसहरी या नक्षलग्रस्त जिल्ह्यात रचनात्मक काम करीत होते. जे.पीं.नी या विद्यार्थ्यांना काही अटी टाकल्या व आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले. जे.पीं.चा स्पर्श झाल्यामुळे काही मागण्यांच्या या आंदोलनाचे रूपांतर जनतेच्या चळवळीत झाले. संपूर्ण क्रांती या शब्दाने त्यांनी व्यवस्था परिवर्तनाचा संदेश दिला. पुढे हे आंदोलन देशाच्या विविध भागांत पसरले. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. जे.पीं.च्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. त्यांनी जनता पक्ष स्थापन केला. निवडणुका झाल्या. त्यात पहिल्यांदा काँग्रेस विरोधकांचे सरकार केंद्रात आले. जे.पी. वयस्क झालेले. त्यात त्यांच्या किडनींवर परिणाम. जनता पक्षाकडून घोर निराशा झालेली. अण्णा हजारे यांची तुलना महात्मा गांधींशी व त्यांच्या आंदोलनाची तुलना 1974-75 च्या आंदोलनाशी केली जाते. ही तुलना अवास्तव आणि अनावश्यक आहे. अनावश्यक यासाठी की जो तो नेता त्या त्या परिस्थितीत जन्माला येत असतो. गांधी, जे.पीं.च्या काळातील परिस्थिती आज राहिलेली नाही. म्हणून त्यांची एकमेकांशी तुलना करणे अनावश्यक आहे. ती अवास्तव कशी हे मात्र समजून घेतले पाहिजे. म. गांधी आणि जयप्रकाश यांना जगातील अनेक देशांचा अनुभव होता. गांधी ब्रिटनमध्ये शिकले. आफ्रिकेत कामासाठी गेले. तेथे त्यांनी अनेक आंदोलने केली. जे.पी. अमेरिकेत शिकले. त्यांचाही जगभरातील नेत्यांशी संपर्क होता. असा जागतिक अनुभव अण्णांकडे नाही. गांधी आणि जयप्रकाश यांना समाजाचे आकलन होते. त्यांना विचारांची दृष्टी होती. गांधीजींकडे तर जीवनविषयक तत्त्वज्ञान होते. जे.पीं.कडे समाज परिवर्तनाचे आडाखे होते. अण्णांकडे असे काही असल्याचे दिसत नाही. अण्णा हे सिस्टेमॅटिक ट्रिटमेंट करणारे डॉक्टर आहेत. उदाहरणार्थ एखाद्या माणसाच्या पायाला फोड आले. तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी फोड पाहिले की लगेच त्यावर मलम लावून पट्टी बांधली. निष्णात डॉक्टर पायावरचे फोड पाहतो. मलम लावून पट्टी बांधतोच, परंतु त्याचबरोबर रक्तही तपासतो. रक्त शुद्धीचेही औषध देतो. म. गांधी आणि जे.पी.त्या निष्णात डॉक्टरसारखी उपाययोजना करणारे होते. अण्णा मात्र दुखणे पाहून औषध देताना दिसतात. सरकारी नोकर माहिती लपवितात. चला माहितीचा अधिकार द्या. भ्रष्टाचार वाढतो आहे. घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत. चला लोकपाल बिल मंजूर करा. भ्रष्टाचार का होतो? घोटाळे का होतात? याचा कारणांचा काही शोध घेतला का? ती कारणे तशीच ठेवून जर केवळ मलमपट्टी केली तर त्याचीही गत माहितीच्या अधिकारासारखी होऊन जाते. आज त्या कायद्याचा वापर कमी व गैरवापर जास्त होताना दिसतो. गावोगावी चोरावर मोर निर्माण झालेले आहेत. माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करतो म्हणून भिडवून पैसे उकळले जातात. या चोरांवरच्या मोरांची भीती गैरव्यवहार करणार्‍या भ्रष्टांना अजिबात वाटत नाही. ते तुकडा टाकून त्यांची तोंडे बंद करतात. भीती वाटते चांगल्या कर्मचार्‍यांना. आपण काही केले नाही तरी ससेमिरा लागू शकतो, ही दहशत कायम असते. माहितीच्या अधिकारासोबत ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या न केल्यामुळे एक चांगला कायदा वाईटांच्या हातातील कोलीत बनला आहे.आपल्या समाजातील अनेक रोगांच्या मुळाशी सरकारीकरण हे एक प्रमुख कारण आहे. पण सरकारचा काळा पदर दूर सारण्याची कोणाची हिंमत नाही. पुष्कळदा इच्छा नाही. सरकारीकरण कायम ठेवून आपण भष्टाचार निर्मूलनाची इच्छा धरणे हे दिवास्वप्न पाहण्यासारखे आहे, हे ना अण्णांच्या गावी आहे, ना त्यांच्या समर्थकांच्या. गांधी व जे.पी. प्रश्नाच्या तळाशी जाऊन उपाययोजना सुचवायचे. अण्णा आणि गांधी-जे.पीं.मधला हा मूलभूत फरक आहे. कायद्याचे जंजाळ आणि जटिल प्रशासकीय पद्धत ही भ्रष्टाचाराची मूळ कारणे मानली जातात. कायदे कमी करा व प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करा असे म्हणणे तर्कसंगत ठरते. नोकरशाही वाढली तर भ्रष्टाचार वाढतो असाच आजवरचा आपला अनुभव आहे. लोकपालाची नवी नोकरशाही नेमल्याने भ्रष्टाचार कमी कसा होईल? गांधी आणि जे.पी. यांच्या विचार व कार्यपद्धतीत सरकारी हस्तक्षेप कमी असावा असा आग्रह असायचा. अण्णा मात्र नवी नोकरशाही, नवे कायदे मागून सरकारी हस्तक्षेप वाढवून मागतात. त्यामुळे गांधी-जे.पी. यांची अण्णांशी तुलना अवास्तव ठरते.

(लेखक हे नामवंत विचारवंत व

सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी-9422931986

Thursday, 2 August 2012

वन्यप्राणी 'प्रेमाचा' हैदोस


2000 साली अपघाताने पत्रकारितेत आलो. त्यावेळेचा प्रसंग आजही आठवतो. ज्या वृत्रपत्तात काम करीत होतो त्या वृत्रपत्राच्या पहिल्या पानावर एका हरणाच्या मृत्यूची हरणाच्या रंगीत छायाचित्रासह हेडलाईन होती. तर त्याच दिवशीच्या पेपरमध्ये कोपर्‍यात कोठेतरी चार ओळीची शेतकर्‍याच्या आत्महत्येची बातमी होती. योगायोगाचा भाग म्हणजे हरणाच्या एका कळपाने त्या शेतकर्‍याच्या पिकाचे अतोनात नुकसान केले. त्या धक्क्यातून तो सावरलाच नाही. आत्यंतिक निराशेपोटी त्याने आत्महत्या केली.

ज्या हरणाच्या कळपाने शेतकर्‍याला आत्महत्या करण्यास भाग पाडले तो आत्महत्येनंतरही वृत्रपत्राच्या कुठल्यातरी कोपर्‍यात चार ओळीतच पेपरने गुंडाळला होता.

तर हरणाच्या मृत्यूला मात्र त्याच्या रंगीत छायाचित्रासह वृत्तपत्राच्या प्रथम पानावर मथळा होता. शेतकर्‍याच्या मृत्यूपेक्षाही हरणाचा मृत्यू मौल्यवान ठरला होता. शेतकरी हा खरं तर नायक ठरायला हवा होता. पण जो वन्यप्राणी शेतकर्‍याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला होता तोच खलनायक वन्यप्राणी वन्यप्रेमींसाठी 'नायक' ठरला होता. म्हणून तर नायकाच्या मृत्यूला 'मथळा' तर शेतकर्‍याच्या मृत्यूला वृत्तपत्रात 'कोपरा' नशिबी आला होता.

वन्यप्राण्यांविषयीचा हा उमाळा दिवसेंदिवस जोरात फसफसून वाहतो आहे. वन्यप्राणीच नव्हे तर सर्वच प्राण्यांविषयीचे प्रेम सध्या उतू जात आहे. मनेका गांधींचे प्राणी प्रेम तर सर्वश्रुतच आहे. पण अनेक 'विश्वामित्र' प्राणी प्रेमाच्या तप साधनेत मग्न आहेत. झिनत अमान ह्या नटीला नुकतेच घोडे प्रेमाचं भरतं आल्याची बातमी वाचली, तर 'गाढव' प्रेमापोटी करण्यात आलेला 'गाढव कायदा'ही आपल्या वाचनात येतोच.

साधारणत: दोन आठवडय़ांपूर्वी नागपंचमीचा सण होऊन गेला. या दिवशी सापांचे पूजन व स्मरण केल्या जाते. पूर्वी गारुडी टोपलीत नागबाबा घेऊन पुंगी वाजवून आपले पोट भरायचे. पण 1998 मध्ये महाराष्ट्रात गारुडय़ांवर बंदी घालून त्यांच्या पोटावर पाय देत सर्पमित्र नावाचे नवे गारुडी तयार झाले आहेत. सापांची संख्या वाढते आहे किंवा कमी होत आहे हे सर्पमित्रच जाणोत, पण सर्पमित्रांची पिलावळ मात्र गेल्या काही वर्षात बेसुमार वाढते आहे, हे मात्र तेवढेच खरे.

आजकाल नागपंचमीचा दिवस सापांपेक्षा सर्पमित्रांचाच अधिक असतो.

नागपंचमीच्या दिवशी बहुतांश सर्व वृत्रपत्रांमध्ये सर्पमित्रांच्या मुलाखती साप हातात धरून वा गळ्यात टाकून त्यांचे फोटो सर्वत्र झळकतात. प्रामुख्याने त्या मुलाखतीचा सारांश असतो, 'साप हा शेतकर्‍यांचा मित्र आहे.' (शेतकर्‍यांना आपला मित्र व शत्रू ओळखण्याची अक्कल नसल्यामुळे ती शिकविण्याची जबाबदारी 'सर्पमित्रा'वर असते.) उंदीर शेतातील अन्नधान्याची नासाडी करतात. अशा उंदरांना साप खातो व पर्यायाने अन्नधान्याची नासाडी थांबविण्याचे काम साप करतो. (अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये मोठय़ा प्रमाणावर अन्न धान्याची नासाडी होते. ती नासाडी थांबविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर साप पोसण्याची कल्पना अजून कोणाला कशी काय सुचली नाही? कदाचित रोगापेक्षा साप पोसण्याची उपाययोजना त्यांना भयंकर वाटत असावी. अशा भयंकर योजना शेतकर्‍यांसाठीच योग्य, असे सर्पमित्रांना वाटत असावे.) सर्वच साप काही विषारी नसतात. साप काही आपण होऊन डसत नाही. त्याच्यावर पाय पडला किंवा त्याला हात लागला तरच तो डसतो. (माणसांचा हात किंवा पाय सापावर पडतो तो जणू काही मुद्दामच सापाने येऊन त्यांना डसावे म्हणूनच.) साप कोणाचाही डुख धरत नाही. कारण त्याचा मेंदूच इतका लहान असतो की त्यात 'दुश्मनी'ची नोंद ठेवणेच शक्य नाही. (परंतु सापांशी मैत्री मात्र शक्य आहे. तेव्हा सर्पमित्रांच्या मते त्याचा मेंदू वाढत असावा.)

एखाद वेळेस प्रेम एकतर्फी केल्या जाऊ शकते. परंतु मैत्री ही उभयपक्षी गोष्ट आहे. साप डुख धरू शकत नसेल तर तो मैत्रीही करू शकत नाही. म्हणजे मग सापाशी मैत्री ही एकतर्फी गोष्ट होऊन बसते. त्यासारखी तद्दन मूर्खपणाची दुसरी गोष्ट नाही. पण हा मूर्खपणा मात्र सर्रास सुरू आहे.

देशभरात सर्पदंशाच्या दरवर्षी सुमारे 2 लाखांपेक्षा जास्त घटना घडतात. यात साधारणत: 15 हजारांपेक्षा जास्त व्यक्ती उपचाराअभावी मरतात. ही मरणार्‍यांची संख्या प्रामुख्याने खेडय़ापाडय़ातील लोकांची असते. आता खेडय़ापाडय़ातीलच लोक सर्पदंशाने अधिक मरत असतील तर त्यांच्या मरण्याची चिंता करण्याचे कारण नाही. सापाच्या मरण्याची मात्र चिंता करा, असा बेशरमपणाचा संदेश देणारे हे सध्याचे फसफसून उतू जाणारे वन्यप्राणी प्रेम आहे. सापांशी मैत्री करताना, सापांचे संरक्षण करताना साप डसून जी माणसं मरतात त्यांच्या उपचाराची सोय व्हावी. या देशातील कोणताही माणूस साप डसून मरू नये यासाठी गावोगावी 'अँंटी स्नेक व्हेनम' ही लस उपलब्ध असावी, असे मात्र सर्पमित्रांना वाटत नाही. त्यासाठी ते आग्रही असत नाही. माणूस मेला तरी चालेल, पण साप मरता कामा नये, अशी यांची भूमिका. बहुतांशी साप जे केवळ चित्रांमध्ये पाहतात त्यांचा 'सर्पमित्र' या संकल्पनेला जोरदार पाठिंबा असतो. कारण त्यांचे सर्पप्रेम 'आयजीच्या जीवावर बायजी उदार'च्या धर्तीवर असते. नागपंचमीच्या निमित्ताने 'सर्पमित्रां'च्या मुलाखतीमध्ये जखमी सापांवर उपचारांची व्यवस्था व्हावी. 'स्नेक रेस्क्यू सेंटर' गावोगावी असावे, अशा मागण्या त्यांनी केल्या पण साप डसल्यानंतर सर्पदंशाने बाधित माणसांवर उपचार व्हावा, त्यावर मात्र कोणी बोलत नाही.

साप डसून आजही ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर प्राणहानी होते त्या विषयावर न बोलता सापांच्या मरण्याची चिंता केली जाते. याच्या इतका निर्लज्जपणा दुसरा कोणता असू शकतो?

वन्यप्राण्यांचे 'कोडकौतुक' कोणाला करायचे ते करू द्या. पण हे कोडकौतुक शेतकर्‍यांच्या जीवावर, खेडय़ापाडय़ातील माणसांच्या जीवावर कशापायी? वन्यप्राण्यांनी पिकाची नासाडी करावी त्यापायी शेतकर्‍यांना जीव नकोसा व्हावा.

हरिण, रोही, रानडुक्कर, माकडं यांच्या त्रासापायी शेतकरी हैराण आहेत. उभ्या पिकातील त्यांचा धुमाकूळ शेतकर्‍यांचा जीव नकोसा करताहेत. त्या विषयावर कोणी सहानुभूतीने बोलत नाही. शेतकर्‍याचे ढोर इतर पिकात गेले किंवा जंगलात चुकून शिरले तरीही त्यासाठी कोंडवाडा आहे. शेतकर्‍यांना त्याची शिक्षा आहे. पण सरकारी ढोर त्याच्या पिकाची नासधूस करतात त्याबाबत मात्र नुकसान भरपाई नाही, ना कोणाला शिक्षा. वन्यप्राण्यांना काय जगवायचे ते खुशाल जगवा, पण शेतकर्‍यांच्या जीवावरच त्यांचे जगणे किती दिवस?

'शेतीच्या रक्षणासाठी शेतकर्‍यांना बंदुका द्याव्यात.. जर शेताची डुकरे आदी प्राण्यांनी नासधूस केली तर पोलीस अधिकार्‍यांना जबाबदार धरून त्यांच्या पगारातून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी. असे घडले तरच शेतकर्‍यांना रात्री भरपूर विश्रंती व झोप मिळेल.' 134 वर्षापूर्वी 'शेतकर्‍यांचा आसुड'मध्ये महात्मा फुलेंनी लिहिलेली ही वाक्ये आहेत. त्यावेळेस जंगल खाते नसल्यामुळे शेतकर्‍यांचे होणारे नुकसान पोलीस अधिकार्‍यांच्या पगारातून द्यावे असे ते सुचवितात. पण त्याही पेक्षा वन्यप्राण्यांच्या त्रासाने हैराण शेतकरी हा त्यांच्या आस्थेचा व जिव्हाळ्याचा विषय बनतो. आता तर एकदमच त्याच्या उलट होत आहे. सापाचे जगणे हे खेडय़ापाडय़ातील माणसांच्या जगण्यापेक्षाही मौल्यवान ठरत आहे.

महात्मा गांधी तर अहिंसेचे पुजारी. परंतु त्यांच्या अहिंसेतही प्राणिहत्येचा भाबडा निषेध नव्हता. 1926 साली अंबालाल साराभाई या त्यांच्या मित्राने त्याच्या मालकीच्या औद्योगिक परिसरात हिंडणारी 60 मोकाट कुत्री पकडून नष्ट केली. याबाबत बराच गदारोळ उडाला. पण 'यंग इंडिया'मध्ये महात्मा गांधींनी या कृत्याचे उघडपणे समर्थन केले. 1928 साली साबरमती आश्रमातील फळझाडांना व शेतातील पिकांना माकडांचा उपद्रव वाढला तेव्हा त्यांना मारून टाकण्याचा प्रस्ताव खुद्द महात्मा गांधींनी मांडला होता. पण आश्रमाच्या सहकार्‍यांनी तो फेटाळला. साप चावून मूल मरण्यापेक्षा सापाला मारले तर मला वाईट वाटणार नाही, असेही ते म्हणत. सापांना पळवून लावण्याचे इतर सर्व उपाय थकल्यानंतर सापांना मारण्याची परवानगी महात्मा गांधींनी दिली होती.

निश्चितपणे माणसांविषयी कणव आणि प्रेम असणाराच माणूस असं म्हणू शकतो. शेतकर्‍यांविषयी शेती पिकाची होणारी नासाडी याविषयी महात्मा फुल्यांना व महात्मा गांधींना कणव होती. म्हणून वेळप्रसंगी माकडं मेली तरी चालेल, पण पिकांची नासाडी होता कामा नये, असे गांधी म्हणाले. आणि लहान मूल मरण्यापेक्षा सापांना मारणे अधिक उचित असे त्यांना वाटल्यास नवल नाही.

पण सध्या आपल्या देशाचा वन्यप्राण्यांच्या बाबतचा प्रवास महात्मा गांधी ते मनेका गांधी असा होतोय.

तिथे माणसांपेक्षा सापालाच महत्त्व अधिक येणार हे ही स्वाभाविकच म्हटले पाहिजे.

माणूस मरो पण साप जगला पाहिजे. पिसाळलेला कुत्रा डसून माणूस मेला तरी चालेल कुत्रा जगला पाहिजे. शेतकर्‍यांच्या पिकाची नासाडी करून शेतकर्‍यांना आत्महत्या करावी लागली तरी हरकत नाही. पण हरणाची हत्या मात्र होता कामा नये. घोडागाडी चालविणारा उपाशी मेला तरी चालेल पण गाडीला घोडा जुंपता कामा नये.

उद्या बैलांच्या बाबतीतही असाच कळवळा झिनत अमनला आला तर? मग शेतकर्‍या तुझं काही खरं नाही.

(लेखक  चंद्रकांत वानखडे   शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी - 9822587842
     

दारूचे योगदान


दचकलात ना? सदरहू लेख हा सोमरसाविषयी काही संशोधनपर लेखन असावे असा गैरसमज शीर्षक वाचल्यावर होऊ शकतो मात्र तसे काही नाही. आणि सदरहू लेखकही पूर्णपणे शुद्धीवर राहून हा लेख लिहीत आहे याबाबत किमान लेखकाचे तरी दुमत नाही.

प्रिय वाचकहो (असं सातत्याने लिहिलं की लेखक काही दिवसांनी आपोआप वाचकप्रिय होतो असा एक रूढ गैरसमज आहे.) आपली संस्कृती म्हणजे काय तर नातेसंबंध, मोठय़ांचा आदर, दयाभाव, भूतदया इत्यादी, इत्यादी.

आता या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुमच्या सहज लक्षात येईल की दारू नामक पेयाने ही संस्कृती रुजविण्यासाठी किती मोठे योगदान दिले आहे ते.

काही वर्षांपूर्वी मी एका संस्थेत नोकरी करत होतो. आम्ही सगळ्या कर्मचार्‍यांनी गणपतीची स्थापना केली. दहा दिवसानंतर विसर्जनाच्या मिरवणुकीत प्रथेप्रमाणे बहुतांश कर्मचार्‍यांनी एनर्जी ड्रिंक घेतले. अध्र्या-पाऊण तासाने त्यातला एक माझ्यापेक्षा वयाने 15-20 वर्षे वडील असलेला माझा एक सहकारी माझ्याजवळ आला. मला मिठी मारली व माझी पाठ थोपटत मला म्हणाला, 'गजाननराव तुम अपने छोटे भाई, कुछ गलती हुई तो मेरेकू माफ करदो' अन् असं म्हणून तो माझ्या पाया पडला. थोडय़ा-थोडय़ा वेळाने तो माझ्या जवळ यायचा अन् 'गजाननराव तुम अपने छोटे भाई, कुछ गलती हुई तो मेरेकू माफ करदो', अन् माझ्या पाया पडायचा. मलाही गंमत वाटत होती. थोडय़ा वेळाने मावळ्याच्या सोंगाजवळची तलवार घेऊन तो आला अन् आवेशात मला म्हणाला, 'गजाननराव तुम बोलो, तुमको किसने तकलीफ दिया? सालेकू काट डालता, मेरे छोटे भाई के लिए आज मै खुन से नहाऊंगा !' अन् मग आठदहा जणांनाही तो आवरेना. मला सांगा कुठल्याही नॉर्मल माणसाने तुमच्यावर इतकं प्रेम कधी केलं का? ही जी भ्रातृप्रेमाची उकळी फुटली ती पावशेर पोटात गेल्यावरच ना? शुद्धीवर असताना सख्ख्या भावाशीही धड न बोलणारे, विमानाने टेक ऑफ केल्यानंतर कुणाचेही होतात ही किमया कशाची?

माझ्या एका मित्राच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता. रात्री 10-11 वाजल्यानंतर काही लोकांचे जेवण बाकी असताना कॅटरिंगवाल्या पोरांनी जेवणाची आवरासावर केली. त्या दरम्यान कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टर एनर्जी ड्रिंक घ्यायला गेला होता. त्याला फोन केल्यावर तो आला तो 'ओ.के. टेश्टेड' हूनच आला होता. पोट्टय़ांना शिव्या देऊन त्याने पुन्हा सगळं जेवण लावायला लावलं अन् माझ्या मित्राच्या गळ्यात पडून रडायला लागला, 'भाऊ मेरेसे गलती हो गई, मेरेकू माफ करदेव!' (टिंग झाल्यानंतर सगळे हिंदीत का बोलतात किंवा तसा जी.आर. आहे का हा संशोधनाचा विषय आहे.) असं चार-पाचदा झाल्यावर तो सर्वासमोर म्हणाला, 'तुमारेकू मैं अंदर की बात बोल्ता ये आदमी मेरा ज्यवाई है अन् मै इसका साला हँू !' माझा मित्र चपापला, चार-चौघात आपल्या साळ्याचे दर्शन व्हावे अन् तेही या स्वरूपात अशी त्याची इच्छा, अपेक्षा, कल्पना नव्हती. या प्रसंगानुसार पुन्हा एकदा नातेसंबंध दृढ करण्यासाठीच नव्हे तर नवीन नाते निर्माण करण्यातही दारूचे योगदान स्पष्ट होते. ('दारू की धार अन् प्यार की बहार' असा एक प्रबंध लिहिण्याचेही प्रस्तुत लेखकाच्या मनात आहे.) काही मंडळींच्या बाबतीत तर हा प्रकार इतक्यांदा घडलाय की माझी चूक झाली मला माफ करा असं सहजही कुणी म्हटलं तरी ते त्याच्या तोंडाचा वास घेतात. सिनेमावाल्यांनीही बहुतेकदा खलनायकाला दारू पिताना दाखवून दारूचं अवमूल्यन केलंय. परंतु मद्य प्राशनानंतर फुटणार्‍या बंधुप्रेमाच्या किंवा एकूणच प्रेमाच्या उमाळ्याचं एकही दृष्य न दाखवून या तमाम प्रेमदूतांवर अन्यायच केला नाही का?

नुकतेच एका ह.भ.प. मंत्रिमहोदयांनी आदिवासींमधला भ्रातृभाव बळकट करण्यासाठी मोहाच्या फुलांपासून हर्बल लिकर निर्मितीचा संकल्प सोडला. शहरवासी अन् आदिवासी यांच्यातलं अंतर क्षणात मिटवणारी ही क्रांतिकारी कल्पना मांडणार्‍या माणसाचे खरेतर समाजाच्या सर्व थरातून कौतुक व्हायला हवे. मात्र काही नतद्रष्ट बुद्धिजीवी आदरणीय मंत्रिमहोदयांच्या विरोधात वृत्तपत्रातून पानेच्या पाने खरडत आहेत यापेक्षा दुर्दैव ते कोणते.

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत. 'गंमत जमंत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650

काळजाला त्रास होतो.. बारमाही!!


तसा हा श्रवणाचा महिना. कुठे श्रवणासारखाच रिमझिम, कुठे थेट पावसाळ्य़ासारखा गच्च मिठी मारून बसलेला.. तर कुठे कोरडा ठणठणीत! जीवघेणा! उदासवाणा!

पण श्रवण म्हटलं की हिरवळ.. फुलणं. बहरणं. भुरभुरणं आणि अचानक छेड काढून लपून बसावं. तसा सारा खटय़ाळपणा! ऊनही. पाऊसही! तापणंही-विझणंही! शहराणंही-भिजणंही!

श्रवण म्हणजे निरनिराळे रंग.. निरनिराळया छटा.. सप्तरंगी इंद्रधनुष्यचं! आपलं जगणंही तसंच..श्रवणासारखं!

सोहळा हा खास होतो. बारमाही

आगळा वनवास होतो.. बारमाही!

भेटलो का आठवेना. बोललो का आठवेना

का तुझा आभास होतो. बारमाही?

वादळाच्या सोबतीला पेरले का चांदणे तू.

काळजाला त्रास होतो. बारमाही!

या नदीला., त्या नदीला. त्या नदीला पूर येतो.

.आणि मी मधुमास होतो. बारमाही!

केवढी भन्नाट आहे. सांडण्याचा खेळ सारा.

जन्म होतो, र्‍हास होतो.बारमाही!!

खरंतर आयुष्यात खूप माणसं भेटतात. काही ओळखीची होतात. काही पाहुण्यासारखी मनात येतात. काही भाडेकरूसारखी असतात- सरळ सरळ सोय पाहून चालणारी! देवाणघेवाण करणारी! सोयीचे हिशेब सांभाळणारी!

काही माणसं तर 'एटीएम'सारखीच! चोवीस तास आनंदाची बरसात! कधीही आठवण करा.. लगेच मोरपिसासारखी मनाला छेडून जातात! अशी माणसं आयुष्यात आलीच तर त्यांना ओळखता आलं पाहिजे! जपता आलं पाहिजे! हृदयाचं कोंदण त्यांच्या हवाली करता आलं पाहिजे. मनापासून सादही देता आली पाहिजे! प्रतिसादही देता आला पाहिजे.

व्याकुळलेलं हिरं रान

एकेक फांदी, एकेक पान

नदी-नाले लावून बसले

तुझ्या शब्दाकडे कान

आतुर झाले फुलण्यासाठी

काटेगोटे बाभूळबन

निदान त्यांच्यासाठी तरी

तू फक्त 'हो' म्हण!

खरंतर आयुष्य आहेच किती इवलसं? पण तेही आपण धड जगत नाही. स्वत:चं आयुष्य जगण्यापेक्षा इतरांची छिद्र बघण्यातच वेळ का घालवतो. याचे दोष काढा, त्याचा घास आपल्याकडे ओढा, यातच आपल्याला मजा येते! सुखदु:खाच्या आपल्या कल्पनाच फसव्या! खोटय़ा! दांभिक! 'इगो' सांभाळण्यातच आपण सदैव गुंतलेले असतो. त्या नादानपणातच सुख केव्हा चिमटीतून निसटून गेलं याचा आपल्याला पताही लागत नाही. आणि जेव्हा कळायला लागतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

आयुष्य किती छोटे. चल धो धो बरसू या

दे फेकून दे लोटे. चल धो धो बरसू या!

तू सोड तुझा हेका.. अन् मीही खुला होतो

कोणीच नसे मोठे. चल धो धो बरसू या!

तू काल म्हणालीस ना, 'मी खूप सुखी आहे'

सारेच तुझे खोटे. चल धो धो बरसू या!

मन मारून जगण्याने जगणेच वजा होते

झालेत किती तोटे. चल धो धो बरसू या!

बरेचदा ढगामध्ये किती पाणी असेल याचा विचार करण्यातच आपला वेळ वाया जातो. आपल्या तळ्य़ाची खोली आपण तपासूनच बघत नाही. कमी असेल तर ती वाढवण्याचा प्रयत्नही करत नाही आणि मग माझ्याच वाटय़ाला वाळवंट का आलं? असा ओरडा करत बसतो. ज्याच्या वाटय़ाला बागा आल्यात. ज्यांचे मळे बहरलेत त्यांची मेहनत, त्यांची निष्ठा, त्यांचे समर्पण याचा कधी विचारच करत नाही.

चार भिंतीच्या आत स्वत:ला कोंडून घेणार्‍याला बाहेर बघण्याची कितीही इच्छा झाली तरी खिडकीपेक्षा मोठं आभाळ दिसणार तरी कसं? त्यासाठी बाहेरच यावं लागेल! भिंती तोडाव्या लागतील! कुंपणं तोडावी लागतील!

जसे कोवळे रंग पानातले

जसे मोकळे श्वास रानातले

तसे गाऊ या, मी म्हणालो परंतु..

तुझे वागणे संविधानातले!

म्हणून मनाच्या हाका ऐकायला हव्यात! आतल्या लाटांना मोकळं सोडायला हवं! मनाचे कायदे वेगळे! माणसाचे कायदे वेगळे! आपले कायदे वेळोवेळी बदलत असतात. बदलले जाऊ शकतात. त्यामुळे फारसा काही फरकही पडत नाही. निसर्गाचे कायदे मात्र कधीच बदलत नसतात. टाळतो म्हटलं तरी फार काळ टाळता येत नाहीत. आपण आपली छत्री उघडली म्हणजे पाऊस थांबला असे होत नाही. तो कोसळतच असतो. भिजवतच असतो.

.तेव्हा.. श्रवणामध्ये भिजायचं. की दुलई पांघरून निजायचं.

ज्याचं त्यानं ठरवावं! करा विचार!

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपट निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी'

हा त्याचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

Tuesday, 31 July 2012

फॅमिली डाक्टरायची हे आखरी पिढी



दोस्ताय हो या आंधी तं हरेक मंगयवारी तुमच्यातल्या काईचे फोन येतचं होते, पन मांगच्या मंगयवारी 'मायचं बिल देता का?' या भागावर्त इतके फोन आले का लेयनार्‍याले समाधान व्हावं आन् आपलं लेयेन वाचनार्‍यायच्या कायजापावतर जावे हे जवा तुमच्या फोनच्यानं कयते त्याची खुसी सबुदात नाई सांगता येत. मी सार्‍यायले पुन्यांदा धन्यवाद देतो. तुमचं पिरेम हेच लेयन्याची ऊर्जा असते. काई वाचकायची असी मागनी होती का त्या डाक्टरांच्या अखीन काही आठोनी आठवत असतीनं तं जरूर लिहा.

माह्या लहानपनी खरं तं पयस्याले लय लय किंमत होती. त्याच्याच्यानं तो खर्च करतानी मानूस इचार करूनच खर्च करे. होईन तवरिक निभून न्याची पाहे. आता कसं थोडसं दुखलं तं डाक्टर सिवाय पर्याय नाई, पन तवा कसं होतं का समजा पाय मुरगयला आन् सुजला तं जानकार सांगे 'अरे' थो अमका अमका पाला कोनाले सांगून आनून घे आन् बांध. कमरीचे म्हनलं की या बोटाच्या कांडय़ावानी बिना पाल्याचा येल हाय आपल्या शायेच्या पलीकून थो हातभर तोडून आनाचा. त्याले कुटाचा आन् त्याच्यात शेंदूर आन् आंड फोडून त्याले एकात मिसयून त्या लगद्याचा लेप चांगल्या कापडय़ाच्या पट्टीवर्त घेऊन तो कमरीले बांधून आराम कराचा. तीन दिवस असं कराचं. पाहय़ आरम पडते का नाई? कोनी दुसरा इलाज सांगतानी सांगे, अरे नदीच्या थडीनं हडसन निघानी असनं आता. ते उपडून आनाची आन् आपन मेथीची भाजी करतो तसी करून खाची. आता सांगनारे भेटत नाई आन् भेटला तं ते कुटाना कोन करत बसनं. त्या परीस आनला बजरंग लेप आन् लावला असे नयतूरने पोरं म्हनते.

आमच्या गावाले दुसरे सरकारी डाक्टर आले ते डॉ. सुधाकर पुरी. मी त्यायच्या कुटुंबाचा घटकचं झालो होतो. एक डाव वयनी पोरायले घेऊन माहेरी नागपूरले गेल्या होत्या. म्या संध्याकायच्या दवाखान्यात जाऊन त्यायले इचारलं का, ''तुमी घरी जेवाले येता का मंग आपल्या दोघांचा डबा घेऊन मी तुमच्याकडं येऊ ?'' ते म्हने, ''डबाचं घेऊन ये. मी जेवायला येणार म्हटलं की आईपासून सगळे जेवायचे थांबतात. त्यापेक्षा डबाचं घेऊन ये.'' राती नऊ साडे नवले आमी जेवनं केलं आन् गोठे करतं बसलो. बैयलाच्या घंटय़ायच्या आवाजा संग खासर (बैलगाडी) थांबल्याचा आवाज झाल्याच्यानं म्या घडाय पाह्यलं तं रातीचे साडेअकरा वाजले होते. त्यायनं आवाज देल्यावर्त म्याचं दाठ्ठा (दार) उघडला. जवयगाववून ते दोघे आले होते. ते समोरच्या बेंचावर बसल्यावर्त सांगाले लागले,''डाक्टरसायेब घरी दोन मयन्याचं लेकरू हाय. थे सकायपासून निस्त रडून रायलं. रडून रडून अदमुसा होते, पन मायच्या दुदाले तोंड

नाई लावून रायला. आजूबाजूचे लोकं आपापल्या वसरीत बसून हाय. तुमाले न्यासाठी आलो डाक्टर सायेब आमी. डाक्टर सायबान हे आयकून घेतल्यावर्त त्यायले सांगतलं का,''मी तुम्हाला औषध लिहून देतो. तुम्ही बच्चूभाईकडे जा. ते माडीवर झोपले असतीन. त्यायले आवाज द्या. ते उठल्यावर माझं नाव सांगा म्हणजे ते खाली येऊन दुकान उघडून तुम्हाला औषध देतील. ते घेऊन या. मी ते कसं द्यायचं ते समजावून सांगतो.''

ते गयावया करत होते का, ''तुमी चाल्ले अस्ते तं खूप बरं झालं अस्त डाक्टरसायेब.'' आखरीले ते दोघं दवाई आनाले गेल्यावर म्या डाक्टर सायबाले म्हनलं, ते एवढे कायुतीले आलेत. चाला ना, वाटल्यास मी येतो तुमच्या संग. माह्या डोया म्होर सारा सीन उभा झाला. ते इतकुसं लेकरू त्याचा अकात त्याच्याच्यान सारं घर कायजीत जागं आन् शेजारीपाजारी डाक्टर येतेतं या आसीवर वाट पाह्यत असतीन असं चित्र मलेच दिसाले लागलं. ते दवाई घेऊन आल्यावर्त त्यायनं आखीन डाक्टर सायबाले आग्रव कराले लागले. तसे डाक्टर सायेब म्हने, ''निघा तुम्ही पुढे मी याला घेऊन मोटारसायकलने येतो.'' टायमाचा अंदाज घेऊन डाक्टर सायबानं त्यायच्या राजदूत फटफटीले किक मारली. आमी गावापासी आलो. ते वाट पाहत थांबूनचं होते. इतकी रात झाल्याच्यानं गाव झोपलं होतं. मले त्यायच्या घरापासी जाची घाई झाली होती. त्यायचं खासर एका घरा शेजी त्यायनं थांबवलं तं मले वाटलं बाजूच्या गल्लीत घर असनं, पन नाई समोरच्या घरची साखयी यानं वाजोली चांगली तीन-चार खेपा. साखयी वाजोल्यावर्त आतून दाठ्ठा उघडला. गावा संग शेजारीपाजारी झोपले हे तं ठीक, पन इथ तं पेशंट आन् अवघं घर झोपलेलं पाहून मलेच चक्कर याची वक्ता आली.

आमी वापेस निंघालो तवा रस्त्यात म्या डाक्टर सायबाले म्हणलं, ''डाक्टरसायेब माफ करा बुवा. माह्याच्यानं तुमाले झटका झाला.'' त्याच्या वर ते म्हनेत, ''झटका बसणार आहे याची मला पूर्ण कल्पना होती आणि तुला सांगू मी पेशंटसाठी नाही तुझ्या समाधानासाठी मुद्दाम आलो. आम्हाला इतकी सवय झाली असते की, येणार्‍याच्या सांगण्याच्या पद्धतीने आम्हाला पेशंट खरचं सिरीयस आहे की नाही याची कल्पना येते. तसं असतं तर ते पेशंटला घरी ठेवून नाही इथ घेऊन आले असते. पण मी तुला घेऊन न जाता हे सांगितलं असतं तर तुला पटलं नसतं आणि त्यात तुझी काही चूक नसती. आमचा अनुभव तुला कसा असणार?''

मी लहान असतानी बिन सरकारी आमच्या गावच्या बाजूचे डाक्टर होते डॉ. रामकृष्ण ठोकळ. ते दवाई आयुर्वेदिक लिहून देत आन पेशंटले सुई देत. तवा पेशंटचा सुई देल्ली का आपलं दुखनं बसते याच्यावर्त लय इस्वास. कवा कवात पेशंटचं म्हने एखांद पॉवरबाज इंजेक्सन देऊन ह्या डाक्टरसायेब मंग खटखट नाई राहतं. हेयी त्यांले नाराज ना करे. त्यायच्या आजूबाजूले चार-पाच जन बसून नाई असं कवाचं ना होये. ते सारे त्यायच्या गोठी आयकासाठी बसत. माह्या मोठय़ा भावाचं मेडिकलचं दुकानं होतं. त्यांच्या वसरीत पलीकडच्या भितीकडून पेशंट तपासाचा टेबल, पडद्या मांग. बाजुले एका मोठय़ा स्टूलवर वातीचा स्टो सिरींज उकयासाठी. तवा काई ता सारके युज अँड थ्रो अशा सिरींजा नव्हत्या निंघाल्या. आमच्या गावालं मंगयवारचा बजार. त्याच्याच्यानं दिवसभर पेशंटले पेशंट सुरूचं राहे. मंगयवारी थो वातीचा स्टो पेटूनचं राहे. त्याच्यावर्त जरमलच्या गंजात दोन-तीन काचेच्या सिरींजा आन् पाच-सहा सुया पान्यासंग उकयत राहे.

आता सुधारना खूप झाल्या. सकायी मोतीबिंदूच्या अपरेसनसाठी गेलेला पेशंट लेसर का काय म्हन्ते त्यानं अपरेसन करून दुपारी जेवाले घरी येते. पह्यले अपेंडिकच्या अपरेसनले जर बोरीवून पेशंट गेला तं गावाले धाकधुकं लागे. आता तं बायपासचा पेशंट पाच-सहा दिवसात हासत घरी येते. आता सारी पयस्याची दुकानदारी झाली आन् त्याच्याच्यानं पेशालिस्ट डाक्टराच्या जमान्यात फॅमिली डाक्टरायची हे आखरीची पिढी हाये. यवतमायले माह्या ओयखीचे डॉ. हरीश झंवर आन् डॉ. दि. का. बडे हे असेचं. आता तं पह्यले दीडसे, दुसर्‍यान गेले का शंभर. त्यायच्या पॅडवर्त छापूनचं यादी अस्ते. त्याच्यावर्त खुना केल्या का हे तपासून रिपोट दाखवा म्हन्ते. एक डाव माही आजी हा ताल पाह्यल्यावर म्हने, बावू हा कमी सिकला हाय कारे? दुसर्‍याले इचारून आपल्याले काय झालं सांगते.

डॉ. बडे अजूनयी मुलाला नावाने ओयखतात. माह्या मधण्या मुलीला दोन पोरं हाय, पन आपली नितू काय म्हंते असं इचारतेत. चार मयन्या पयले ताप आला म्हून गेलो. बळी काई बोल्लो नाई. त्यायनं दवायीच्या चिठ्ठी संग रक्त तपासाले चिठ्ठी देल्ली आन् त्यायची शंका खरी ठरली, साकर निंघाली. याले म्हंते डाक्टर! फॅमिली डाक्टर म्हनलं का फॅमिलीतलं असल्यावानी अधार वाट्टे मानसाले. ते जे सल्ला देतीनं तो योग्य देतीलनं हे गॅरंटी अस्ते. असा फॅमिली टच असल्याच्यानंचं फॅमिली डाक्टर नाव पडलं असनं लेका!

(लेखक शंकर बडे  हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260