Sunday 16 September 2012

व्हाट इज धिस?


''कोन आहे रे मन्या हा पावना?''

''आपला आतेभाऊ आहे.. मुंबइले असते.. इंग्लिश मेडियमले शिकते''

''याले कायले आनलं वावरात?''

''याले वावराचा परिचय करून द्याले आणलं''

''मग त्याले चांगला इंग्रजीत परिचय करू दे''

''हे पाह्य सचिन.. होल वावर इज अवर.. फ्रॉम धीस धुरा टू देट धुरा''

''व्हाट इज धुरा?''

''धुरा मिन्स बॉर्ड ऑफ वावर! अवर हाप वापर इज इरिगेशन अँण्ड हाफ इज कोरडवाहू''

''व्हेअर इज ट्री ऑफ भाकर?''

''भाकरचं झाड नसते, धांडा असते, ऑन दी शेंडा ऑफ धांडा देअर इज कनूस.. देअर आर लॉट ऑफ दाने इन कनूस.. व्हेन कनूस इज ड्राय दे आर खुळिंग.. पिसिंग इन थ्रेसर देन जेवारी इज तयार होइंग''

''व्हेर इज कनूस?''

''कनूस दसरा झाल्यावर येते, सद्या हॅब्रीट लहान आहे.. नादू इट इज टीन एजर''

''व्हाट आर दॅट लेडी डुइंग?''

''त्या बाया मुगाच्या शेंगा तोडून राह्यल्या, म्हणजे दे आर कटिंग शेंगा ऑफ मूग.. खाऊन पाह्य शेंगा.. अबे वायल्या शेंगा खाऊन राह्यला काय? हिरव्या शेंगा खाय.. पाह्यजो.. फतरासहित खाऊ नको.. दाने काढून खाय.. यंदा मुगाची झळती कमी लागली.. पानीच सुरू हाय दोन मयन्यापासून''

''झळती मिन्स?''

''झळती मिन्स एव्हरेज ऑफ मूग''

''व्हाट इज दी युजेस ऑफ मूग?''

''देअर आर सो मेनी युजेस ऑफ मूग.. वरन इज मेड फ्रॉम मूग.. पापड.. वळ्या.. मुगवड.े.''

''हू इज दॅट मॅन बिलॉंगिंग मशीन ऑन हिज बॅक?''

''तो मानूस पराटीवर फवारे काढून राह्यला, त्यानं पाठीवर फवार्‍याचा पंप घेतला''

''व्हाट इज मीन बाय पराटी?''

''यु डोन्ट नो पराटी? इट मीन्स ट्री ऑफ कॉटन! म्हणजे कापसाचं झाड! नाऊ इट इज ऑन दी फुलोर.. आफ्टर फ्यू डेज इट हॅज प्रोडय़ुस बोंडय़ा.. व्हेन बोंडय़ा आर फुटिंग कॉटन इज कमिंग''

''व्हाट इज धीस?''

''धीस इज ट्री ऑफ अंबाडी! दी भाकर ऑफ अंबाडी इज व्हेरी टेस्टी.. संध्याकाई मामीले अंबालीची भाकर कराले लाऊ''

''व्हाट इज धीस सरप्राईज थिंग?''

''हा सुगरनचा खोपा व्हय''

''हू इज सुगरन?''

''सुगरन मिन्स पाखरू.. शी मेक खोपा फॉर हर चिल्ड्रेन.. शी पुढ आंडे इन धीस खोपा.. आफ्टर समटाइम आंडय़ातून पिल्लू इज कमिंग''

''कॅन आय टच धीस खोपा?''

''तुले एक रिकामा खोपा काढून देतो, मुंबईले घेऊन जाय.. घरात लावून देजो.. चाल तिकड.े. तुले बैलजोडी दाखोतो''

''व्हाय आर दी बुलक गोइंग अप अँण्ड डाऊन?''

''बैल डवरे वाहून राह्यले.. इकडे ये.. बैल मारीन..''

''व्हाट आर युजेस ऑफ बुलक?''

''देअर आर सो मेनी युजेस ऑफ बुलक. पेरनं.. डवरे.. फंटे. बुलक आर फ्रेंड ऑफ फार्मर.. पोळा इज फॅस्टिव्हल ऑफ बुलक.. मागच्याच मयन्यात पोळा झाला.. आपल्या घरी म्हैस आहे.. गाय आहे.. बकर्‍या आहेत.. पाठा आहेत''

''पाठा?''

''पाठा मिन्स गर्ल ऑफ बकरी.. वगार मिन्स गर्ल ऑफ बफेलो.. वासरू मिन्स सन ऑफ काऊ.. अँण्ड कारोळ मिन्स टीन एजर काऊ''

''आय हॅव नॉट धीस नॉलेज''

''तू आठ दिवस वावरात आला की सगळं नॉलेज येते.. हे पाह्य.. धीस इज बंडी.. देअर आर सो मेनी पार्टस् इन बंडी.. धुरे, शिंगाळे, हरनी, आरे, पुठ्ठे, कनागरा.. व्हेन ऑल धीस पार्टस आर जॉइन प्रॉपरली.. देन बंडी इज फॉर्मड!''

''व्हेअर इजर इंजिन ऑफ बंडी?''

''बंडिले इंजिन नसते, टू बुलक आर कॅरी बंडी आपून बंडी बसून घरी जाऊ.. मी तुले बंडी हानाले लावीन.. इकडे ये.. आता तुले आपलं इरिगेशन दाखोतो.. धीस इज चार एकर इरिगेशन.. वांगे, मिरच्या अँण्ड ऑल टाइप्स ऑफ भाजीपाला.. धीस इज मुळा''

''यु मीन रॅडीश? बट देअर इज नो रॅडीश?''

''मुळा जमिनीच्या खाली लागते, गाजर, भुईमूग, कांदे आर अंडरग्राऊंड व्हिजिटेबल अँट कोबी कारले आर आऊटपुट व्हिजिटेबल.. हे व्हय आपली विहीर.. या विहिरीजवळ डेबू पिच्चरची शूटिंग झाली होती''

''हू इज डेबू?''

''डेबू मिन्स गाडगेबाबा! शूटिंग ऑफ डेबू इज परफॉर्म नियर धीस वेल.. आय हॅव टेक पार्ट इन शूटिंग.. मधु कांबीकर याच झाडाखाली जेवाले बसली होती.. अवर शीला इज आलसो सीन इन पिच्चर''

''हू इज शीला?''

''शीला इजर अवर बफेलो.. तिकडे पाह्य.. शीला इज इटिंग ग्रास''

''बफेलो इज ब्लॅक इन कलर बट व्हाय हर मिल्क इज व्हाइट?''

''बिकॉज डिफॉल्ट कलर ऑफ मिल्क इज व्हाइट! दुधाचा रंग आंगचाच पांढरा असते.. कम हिअर आंब्याच्या झाडाखाली बसू. फिरूफिरू थकला तू''

''व्हेअर आर मॅंगो?''

''मॅंगो या टाइमले नसतात.. उन्हाळ्यात असतात.. दे आर इन समर.. तिकडे पाह्य.. आंब्याच्या झाडाले मो लागलं''

''ओह.. हॉऊ स्वीट बटरफ्लाय..''

''बटरफ्लाय नाही.. मोहाच्या माशा व्हयत त्या.. अबे गोटा मारू नको.. अरे बसला गोटा.. मो उठलं.. अबे पय लवकर.. मो मागं लागलं.. चाल धाव.. रन फास्ट.. कुपात आपटला लेकाचा.. ऊठ लवकर.. बाबू हे वावर व्हय.. मुंबईचा बगिचा नाही.. चाल घरी.''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी-9561226572

No comments:

Post a Comment