Sunday 8 July 2012

हॅलो.. मी छबूराव बोलतो


''हॅलो.. मी बोलून राह्यली.''

''छबूराव, वैनीचा फोन हाय.''

''तूच बोल.. मले जादा चढली.''

''हॅलो वैनी.. मी बारक्या बोलतो.. भाऊचा दोस्त.''

''कारे वान्नेरतोंडय़ा.. मी घंटाभर्‍यापासून फोन लाऊन राह्यली.. उचलत काहून नाहीस?''

''ते म्हणजे.. हे म्हणजे.. आम्ही गाळीवर आहो वैनी.''

''गाळीवर? हारन वाजून दाखो.''

''काय वाजवू?''

''हारन! इंग्रजी समजत नाही काय तुले?''

''हारन बिघडला गाडीचा.''

''मग तोंडानं पीकपीक करून दाखो.''

''मले तसं करता येत नाही.. मी गाळी चालून राह्यलो.''

''ते कुठं हायेत?''

''भाऊ आहेत ना.. रिचार्ज मारून राह्यले.''

''काय मारून राह्यले?''

''मोबाईलात रिचार्ज करून राह्यले.''

''मोबाईल सुरू असतानी रिचार्ज कसा मारून राह्यले?''

''मारता येते.. तशी सिस्टीम निघाली.''

''मी काय तुले शेंबुळपुसी दिसून राह्यली काय रे? चाल फोन दे छबूरावजोळ.''

''भाऊ.. फोन घ्या तुमच्या बायकोचा.. अरामानं बोला.. मशीन गरम आहे.''

''हॅलो.. मी छबूराव बोलतो.''

''कुठं हाय तुमची वार्‍यावर वरात?''

''म्हणजे?''

''सध्या कुठं हाय तुम्ही?''

''देवळात.''

''खोटे बोलू नका.. आताच तुम्ही गाडीवर होते.''

''गाडीहून उतरून देवळात आलो.''

''घंटी वाजून दाखवा.''

''या देवळात घंटी नाही.''

''घंटी नाही? भुताचं देऊळ हाय काय?''

''मरीमायचं हाय.''

''खोटे बोलू नका.. तुमच्या तोंडाचा वास येऊन राह्यला.''

''कमाल झाली.. मोबाईलात वास कसा येईन?''

''तुमचे डोये लाल दिसून राह्यले.''

''मी काय तुले टीव्हीत दिसून राह्यलो काय?''

''शिल्लक बोलू नका.. डोये लाल झाले की नाही सांगा?''

''डोयात कचरा गेला.''

''कोन हासलं मधात?''

''कोनी नाही.''

''मले बाईच्या हासाचा आवाज आला.. कोन हाय तुमच्यापाशी?''

''बाई? इथं बाई कायले येईन?''

''मग बाईचा आवाज कसा येऊन राह्यला? खरं सांगा तुम्ही कुठं आहा?''

''मरीमायच्या देवळात आहो ना.''

''त्या देवळात रातचे साडेदहा वाजता कोणती बाई आली?''

''ऑ, हासाले काय झालं तुम्हाले?''

''ते टीव्हीतली बाई हाये.. इकडे फॅशन चॅनल सुरू आहे.''

''देवळात फॅशन चॅनल कायले आलं? लावणारा पागल झाला काय?''

''ते नजरचुकीनं लागलं.''

''सग्ग्या बायकोशी खोटे बोलता काय? मी दोन घंटय़ापासून तुमची वाट पाहून राह्यली, तुमच्यासाठी जेवाची राह्यली, तुमचा सैपाक करून ठेवला.''

''तू जेऊन घे.. मी जेवलो इकडे.''

''आगुदर काहून सांगतलं नाही? मी कायले दनके घ्याले तुमचा सैपाक करत होती? आता त्या उरल्या सैपाकाचं काय करावं?''

''सकाऊन चिवळा करजो.''

''सकायपासून मी तुमचा रातचा सैपाकच करत नाही, आफिस सुटल्यावर तिकून फुगूनफागून येत जा, आता साडेदहा वाजले, तुम्ही दोन घंटय़ापासून मले घुमून राह्यले, मोबाईल बंद करून ठेवला होता, इतक्या रातलोक बारमंधी बसताखेपी जनाची नाही तर मनाची तरी वाटू द्या.''

''हट.. कोन म्हणते मी बारमंधी आहो?''

''तुमाले बोलनं सुचत नाही.. तोतर तोतर बोलून राह्यले, काचाच्या गिल्लासाचा आवाज येऊन राह्यला, दर तिसर्‍या दिवशी ओलावा करता.. याच्यासाठी पगार वाढला काय तुमचा? मोबाईलात रिचार्ज मारून राह्यलो म्हणता.. मले समजत नाही काय रिचार्ज? अळानी आहो काय?''

''एवढी कायले कल्ला करून राह्यली.. मी बारमंधी नाही.. देवळात आहो.''

''तुमच्या गोष्टीले काही लाज नाही.. घरी कधी येता सांगा?''

''आरती झाल्यावर येतो.''

''इतक्या रात्री कोनती आरती असते? तुम्ही घरी या.. तुमची आरती उतरोली नाही त नावाची लंका नाही.''

''उतरल्यावर येतो.''

''दारू उतरल्यावर?''

''दारू नाही.. आरती उतरल्यावर येतो, अभिषेक सुरू हाय सद्या.''

''एकटेच अभिषेक करून राह्यले काय?''

''बारक्या हाय सोबत.''

''त्या वान्नेर तोंडय़ानं तुमाले लत लावली, मी त्याले घरात येऊ देत नाही बुहार्‍याले.. तुमाले दारू प्याले मस्त सोबती सापडला.''

''दारू नाई ना.. तुही गलत फॅमिली होऊन राह्यली.. मी देवळात आहो.''

''पुरावा काय?''

''परसाद आणतो तुह्यासाठी.''

''तुम्ही खा परसाद.. मले अळानी समजले काय?''

''तुही शप्पथ!'

''अशा लयखेप माह्या शपथा घातल्या.. तुमच्या गोष्टीले काही लाज नाही.. मी तुम्हाले शेवटचं सांगते.. उद्यापासून रात्री आठच्या अंदर घरी या.. नाहीतर मी दार उघडणार नाही.''

''कल्ला करू नको.. आलो मी घरी.''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

श्रीकृपा कॉलनी, अकोला रोड, अकोट, जि. अकोला

भ्रमणध्वनी - 9561226572

No comments:

Post a Comment