Monday 19 November 2012

काम ना धाम


'' पुढच्या चकरात घेऊ.. आपून कपळे घ्याले आलो. पैसे कमी हायेत माह्याजवळ'' '' बाबा कपळे?''

''तुमी एका जाग्यावर बसा. मी बराबर आनतो तुमच्या मापाचे कपळे''

''मले साळी कमी भावाची घ्या, पण एखादा डिस्टेंबरचा डबा घ्या. घराले यंदा रंग देऊ''

'' मातीच्या घराले डिस्टेंबर असते काय भयाने? कापसावर पाहू. कापूस निंगाल्यावर पुर्‍या घराले रंग देऊ..बैलाच्या कोठय़ाले डिस्टेंबर. कुळाच्या न्हानीले आईलपेंट. भितीच्या खांडाले आशियन पेंट..''

''अवं माय बारक्या कुठं गेला? हारपला काय पोट्टा?''

'' कुठं होता?''

'' इथीसाच होता.. दुकानातून गायब झाला.. तरी मी म्हनो की लेकरं संभाळा. पण तुमाले एका पोरावर ध्यान ठेवता येत नाही''

''कोनाकोनाले संभाळू? अर्धा डझन आहेत.. कोनाकोनावर ध्यान ठेऊ..''

'' कल्ला करू नका. त्याले पाहा आगुदर''

'' कुठं गेला ससरीचा? कामधंदे सोडा अन् त्याले पाहा. फारच वलवले हाये पोट्ट! एका जाग्यावर थांबतच नाही. मायच्या पोटात नऊ मयने कसं राह्यलं काय मालूम''

''त्याले पाह्यता की इथंच भासन ठोकता?''

'' राहू दे.. आपच येईन''

'' कसा मानूस हाय वं? पोराले कोनं पकडून नेलं म्हनजे काय करसान?''

'' नेऊ दे लेकाले.. अर्धा डझन आहेत''

'' आता काय बोलावं या मानसाशी? पाह्यरे पिंटय़ा त्याले''

'' बाबा.. सापडला बारक्या''

'' कुठं हाय?''

'' तो तिकडे सिनिमाचे पोस्टर पाहून राह्यला''

''ओ बारक्या.. इकडे ये.. कसा भयान्या आहे बे? हारपला म्हनजे कुठं पाहावं तुले? बस एका जागी.. चला आता घरी.''

'' बाबा. आई हारपली''

'' घ्या दाबून.. याच्यातच सारा दिवस चालला.. तू पाह्य मले अन् मी पाह्यतो तुले.. तुह्या मायले पाहून आन आगुदर.. मी बसतो इथीसा.. घोर हाय सायाचा.. रिकामा दिवस तुटून राह्यला.. याले म्हंतात काम ना धाम अन् आंगाले सुटला घाम!''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9561226572'' कान बयरे करतं काय? तसेच दिवाईले दळादळ फटाके फुटतात. दुसरे लोकं फोडतात ते आपून पाहावं. असं समजा की आपल्याच कानापाशी फटाका फुटला''

'' बाबा, आई म्हनते कपळ्याच्या दुकानात चला''

'' बापा बापा. लय गर्दी आहे कपळ्याच्या दुकानात''

'' दिवाईची गर्दी अशीच असते''

'' बाबा, मले- फराक पाह्यजे कॅटरिनासारखा'

'' बाबा मले जीन पॅन्ट''

'' हा फराक केवढय़ाचा आहे भाऊ?''

'' आठशे रुपायाचा''

'' अरे मेला मानूस? हीतभर पोरीचा फराक आठशाचा? एकाएकाचा आठशाचा डरेस घेतला तं चारपाच हजार कपडय़ालेच लागत्यात. आजून साळी घ्याची राह्यली''

'' मंग काय करता?''

'' हातगाळीवर पाहू''

'' मले हातगाळीवरचा नाई पाह्यजे बाबा..''

''यासाठी मी म्हणो की लेकराइले घरी ठेव.. प तुले फार हरीक ..सारी वरात घेऊन आली. इथं कपडे महाग आहेत बाबू.. चला दुसर्‍या दुकानात''

'' हे पोट्टी काहून लडून राह्यली?''

'' मोबाईल पाह्यजे तिले'' ''कोणता मोबाईल?''

'' वीस रुपायाचा''

'' एकाले घेतला की सारेच मागतात. दोन दिवस खेयतीन अन् फेकून देतीन. तू तिकडे कुठं चालली?''

'' भांडय़ाच्या दुकानात''

'' कायले?''

'' शेव काढाचा साचा घ्या लागते''

''काहो बाबूराव, इकडे कुठी?''

'' दिवाईची खरेदी''

'' लय बारदाना दिसून राह्यला तुमच्यासोबत?''

''सारी वरातच आनली. माहे चार लेकरं आहेत. लायन्या गळय़ाचे दोन.

पुरे अर्धा डझन आहेत, कपळे घ्या लागतात त्याहिले''

'' वैनी नाहीत काय?''

'' आहे ना. ते तिकडे मातीच्या उजयन्या घेऊन राह्यली.

हा बारदाना मलेच सांभाळा लागते. लेकरं भीन करून राह्यले मंगापासून''

'' बाबा, मले गुईपट्टी पाह्यजे''

'' बाबा मले बंदूक''

'' मले चष्मा पाह्यजे मोठे बाबा''

''चष्मा कायले बे? म्हतारा झाला काय? जे दिसलं तेच मागतात ससरीचे.. असं वाटते फालतू लेकरं आनले''

'' बाबा, माहे पाय दुखून राह्यले''

'' आली कायले वं? तुले तं म्हटलं घरीच राह्य''

'' मले पाठीवर घ्या''

''ह्या थैल्या कोन धरीन? तुही मावशी येऊन राह्यली काय? जाय. तुह्या आईचं बोट धर. तिकडे गर्दीत घुसू नका. भुलसान लेकहो. एकमेकाचा हात धरा. ओ पिंटय़ा. लायनीचा हात धर.''

'' बाबा, माही चप्पल तुटली''

'' अकात हाय लेकाचा.. चप्पल हाती घे''

'' बाबा आई आली.''

'' दहा रुपये द्या. मी फळा घेतो''

'' घे पटकन. आजून आपली लय खरेदी राह्यली''

'' बाबा मले नवी चप्पल पाह्यजे''

'' नवी कायले बे? चप्पल शिऊन घे.''

'' बाबा, आपून आगुदर फटाके घेऊ''

'' फटाक्याचं दुकान पवून चाललं काय बे? फटाके मांगून घेऊ पैसे उरल्यावर''

'' आगुदर फटाके घ्या.. नाहीतर मी रस्त्यावर लोयन घेतो''

''कोनते फटाके पाह्यजात तुले?''

'' अँटमबाम''

'' अँटमबाम कायले बे? घराले आग लावतं काय? तुही आईच अँटमबाम हाय बाबू.. दिवसभर फटाक्यासारखी कडक आवाजात बोलत राह्यते''

'' मले सुतळी फटको पाह्यजात''
     

No comments:

Post a Comment